पाहिजे असलेल्या आरोपीस घातक शस्त्रासह अटक

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क १ वे अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे शोधात पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्‌दीत पेट्रोलीग करीत असताना, त्यांना उदयनगर चौक येथे सार्वजनिक ठिकाणी एक संशयीत ईसम दिसला असता, तो पोलीसांना पाहुन पळून जात असता, त्यास स्टाफने मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव हर्षल राकेश ब्राम्हणे, वय २४ वर्षे, रा. पॉट नं. २२, भेड़े ले-आऊट, सोनेगाव, नागपुर असे सांगीतले. त्याची कायदेशिररित्या अंगझडती घेतली असता, त्याचे जवळुन एक लोखंडी धारदार चाकु किंमती २००/- रू. चा मिळुन आल्याने, आरोपीचे ताब्यातुन काळ्या रंगाची होंडा अॅक्टीवा व दोन मोबाईल फोन असा एकुण ५५,७००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता, तो पोलीस ठाणे ईमामवाडा येथुन कलम ३०७ भादवि व पोलीस ठाणे प्रतापनगर येथील कलम ३६५, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भा.द.वि., सहकलम ३, २५, ४,२५ मा.ह.का. ये गुन्हयातील पाहीजे आरोपी असल्याची माहीती मिळाली.

आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने शस्त्रासह समक्ष मिळून आल्याने तसेच, त्याने सह पोलीस आयुक्त , नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोहवा योगेश वासनिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून व पुढील कार्यवाहीकामी नमुद आरोपीस पोलीस ठाणे गुडकेश्वर यांचे स्वाधीन केल्यावरून पोउपनि, पवार यांनी आरोपीविरुध्द कलम ४/२५ भा.ह. का, सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोदवुन, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सुहास चौधरी, सपोनि प्रविण महामुनी, राजेंद्र गुप्ता, पोहवा. योगेश वासनिक, बबन राऊत, हेमंत लोणारे, नापोर्स शरद चांभारे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Fri Mar 1 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिला फिर्यादी यांचा परिचित आरोपी नामे अभिषेक यशवंत सुर्यवंशी, वय ३१ वर्षे, रा. हिंगणा, नागपूर याने फिर्यादी महीलेचा वाढदिवस साजरा करण्याचे बहाण्याने फिर्यादी महीलेला त्याचे घरी घेवुन गेला व फिर्यादीस शरीरसुखाची मागणी करू लागल्याने फिर्यादीने नकार दिला असता, आरोपीने तिचे ईच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!