“मतदान निश्चय शपथ” घेऊन केला मतदानाचा निर्धार

– मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही

नागपूर :- निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून, यात प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे, याची जाणीव करून देणारी “मतदान निश्चय शपथ” नागपूर महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन कार्यालयात बुधवारी (ता:१०) घेण्यात आली.

सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, मिलींद मेश्राम, रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सा.प्र.वि.चे अधीक्षक श्याम कापसे, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, विजय बगले यांच्यासह मनपाचे सर्व महिला, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी उपस्थितांना “मतदान निश्चय शपथ” देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती जाणून घ्यावी व इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मतदान करीत इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करणार अशी ग्वाही यावेळी दिली.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, स्वीप अंतर्गत मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन, मंगळवारी झोन अशा सर्व दहाही झोन कार्यालयात संबंधित सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात “मतदान निश्चय शपथ” घेण्यात आली. शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे, तसेच नागपूर शहरात किमान ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट पुर्ण करून नागपूरला प्राविण्य श्रेणीत आणण्यासाठी प्रत्येक मतदाराचे अमुल्य योगदान मिळावे यासाठी मतदारांमध्ये जनजागृती च्या दृष्टीने ही शपथ घेण्यात आली. वर्ष २०१९च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 टक्के पर्यंत वाढावी याकरीता विविध झोन स्थरावर शपथ घेत जनजागृती रॅली काढण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा फुले जयंतीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

Thu Apr 11 , 2024
नागपूर :- सामाजिक क्रांतीचे अग्रदूत अस्पृश्य उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (११ एप्रिल) भारतीय जनपा पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. वाठोडा येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राजेंद्र चकोले, अशोक देशमुख, सुरेश बराई, राजेश संगेवार, किशोर सायगन, राहुल महात्मे, नारायणसिंग गौर, राम बिलकर, भूपेश अंधारे, विक्रम डुंबरे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com