नागपूर :- लोकसभा निवडणुक २०२४ साठी होत असलेल्या मतदाना साठी लोकशाही ची मुल्ये व आपली जबाबदारी या विषयावर संवाद आयोजित आला. लोकशाहीचा मुख्य आधार निवडणुक असुन मताधीकार संविधानिक अधीकार असुन नागरीकांनी मतदान केले पाहिजे. असे आवाहन अँड. अशोक यावले यांनी केले. सुरेंद्र बुराडे यांनी सद्विवेकबुद्धिने मतदान करावे असे सुचित केले. ज्ञानेश्वर रक्षक यांनी मतदान ही व्यापक जनजागृती मोहीम व्हावी अशी सुचना केली. संजय शेंडे, सुरेश वर्षे, अँड. सुधाकर कोलारकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन राजेश कुभंलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिताराम चावके, आनंद माथने, विठ्ठलराव तळवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
मतदान ही व्यापक जनजागृती मोहीम, मतदानासाठी लोकशाहीची मुल्ये व जबाबदारी या विषयावर संवाद
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com