संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ;- पंचायत समिती कामठीच्या वतीने निवडणूक मतदान केंद्राच्या क्षेत्रात येणाऱ्या कंटोन्मेंट गोरा बाजार परिसरात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. दरम्यान कामठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले यांचे मार्गदर्शनात सेंट जोसेफ हायस्कूल कंटोनमेंटच्या वतीने शाळा परिसरातून मतदान जनजागृती अभियानाची रॅली काढण्यात आली. दरम्यान रॅलीतील विद्यार्थ्याणी मिरवणुकीत टाळ मृदगांचा गजरात नागरिकांपर्यंत मतदानाचा जास्तीत जास्त मतदान करण्याचा संदेश दिला. तसेच पथनाट्य द्वारे मतदानाचा मतदानाचा हक्क आपले कर्तव्य आहे याबाबत संदेश दिला तसेच मतदानाचा हक्क, मतदाना विषयी जनजागृती चे फलक घेऊन सहभागी झाले होते, ही रॅली गोरा बजार, माल रोड, पुराना गोदाम परिसरात ठिकठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून लोकशाही बळकटीसाठी प्रत्येक व्यक्तीने मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले सोबतच ज्या तरुणांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी आपले नाव मतदार यादी समाविष्ट करावे मतदान करताना कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले .या मिरवणुकीत गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले म्हणाले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क प्रदान करून दिला आहे त्याकरिता प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषाला, दबावाला बळी न पडता मतदान करावे सोबतच तरुणांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा व आगामी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याकरिता स्वतः पुढे यावे व इतरांनाही जागृत करण्याचे आव्हान केले. मतदान जनजागृती अभियानात सेंट जोसेफ हायस्कूलच्या प्राचार्य सिस्टर निर्मला मायकल, चारुलता फ्रान्सिस, डोरती लॉरेन्स, स्मिता अजित, सोनाली राऊत, पुनम यादव ,उर्मिला राऊत, अपर्णा चांदेकर, जसलीन रोझारिया ,अर्पित बोरकर ,अंकित डालपे सह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.