यवतमाळ :- मोदी सरकारमध्ये महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान राखल्या गेला. महीलांना राजकीय आरक्षण, प्रवासात सुट, अपत्याच्या नावासमोर हक्काची ओळख आणि आता तब्बल तीन कोटी महीलांना “ लखपती दिदि” बनविण्याचा मोदी सरकारचा निर्णय महीला धोरण स्पष्ट करणारा असल्याने महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी तुपटाकळी येथील प्रचार सभेत केले. या सभेला नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या सहकार क्षेत्र, अर्थकारण, क्रिडाक्षेत्र यासह सामाजिक क्षेत्रात प्रचंड योगदान असलेल्या उमेदवार आहेत. काल त्यांच्या प्रचारार्थ तुपटाकळी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महीलांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन राजश्रीताईंना पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रचार सभेला संबोधीत करतांना राजश्री पाटील यांनी मोदी सरकारच्या महीला धोरणाला विषद केले. महीलांच्या विकासासाठी, महीलांच्या सन्मानासाठी मोंदीच्या नेतुत्वाशिवाय पर्याय नसल्याने, सर्वांनी मोदी सरकारलाच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा संपर्क प्रमुख शिवसेना व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, भाजपापचे पुसद जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, जेष्ठ नेते जिवन पाटील, शिवसेना दिग्रस तालुका प्रमुख उत्तमराव ठवकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, सुनील देशमुख, माजी सभापती मिलिंद मानखड, माजी सभापती दीपक कोठारी, माजी सभापती सुभाषचंद्र अटल, सरपंच शेवका सुधाकर राठोड तसेच महायुतीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते युवा वर्ग, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.