नागपूर :-ब्लड फॉर बाबासाहेब 6 डिसेंबर रोजी या अभियानांतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जगभरात ऐच्छिक रक्तदान करून बाबासाहेबांना एक विशाल अभिवादन करण्यात येईल. अशी माहिती पत्र परिषदेमध्ये आतिश मेश्राम व प्रवीण कांबळे यांनी दिली. यासाठी जगभरातून 500हून अधिक विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लाखोच्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. रक्तदानाच्या माध्यमातून मानवी समाजातील नैसर्गिक, समता प्रस्थापित करणे, भारतीय समाजातील स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय धर्मनिरपेक्षता या संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्यास हातभार लागेल असा विश्वास व्यक्त करीत पत्रपरिषदेत माहिती दिली. यावेळी महेंद्र कांबळे, प्रवीण कांबळे, आतिश मेश्राम, चेतन मेश्राम, साक्षोधन कडबे, प्रीतम मेश्राम, विश्वास पाटील, राज सुखदेवे, अरुण भारशंख, आनंद पिल्लेवान व नामा जाधव, एडवोकेट प्रफुल अंबादे प्रामुख्याने उपस्थित होते . भारतासह 6 देशात व 20 राज्यातील तसेच महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात ह्या अभियानांतर्गत सहभाग घेतील अशी माहिती दिली.
ब्लड फॉर बाबासाहेब या अभियानाअंतर्गत जगभरात ऐच्छिक रक्तदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com