मुंबई :- पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. पण, त्या या पदासाठी इच्छूक नव्हत्या. त्या मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी प्रयत्न करत आहेत.
नितीन करीर यांना मुख्य सचिवपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. नितीन करीर हे १९८८ च्या आयएएस बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दुसरीकडे, विवेक फणसाळकर हे पोलीस महासंचालक पदासाठी इच्छूक होते. पुढील नियुक्ती होईलपर्यंत त्यांना पोलीस महासंचालक पदाचा पदभार सांभाळावा लागणार आहे.
Advertisement
रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात येईल अशी दाट शक्यता होती. तशाप्रकारची चर्चा सुरु झाली होती. शिवाय त्या ज्येष्ठता यादीमध्ये सर्वात वरती होत्या. तसेच त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या असल्याने त्यांना पोलीस महासंचालक करण्यात येईल असं जवळपास निश्चित होतं. पण, तुर्तास त्यांना पदापासूर दूर ठेवण्यात आलं आहे.
दुसरीकडे, नितीन करीर हे १९८८ च्या बॅचचे IAS असलेले महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले आहेत. सध्या ते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. आज संध्याकाळी सीएस मनोज सौनिक यांच्याकडून नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला आहे.