वादळी पावसाळामुळे 70 पेक्षा जास्त ठिकाणी पडलेली झाडे मनपाने हटविले

नागपूर : मंगळवारी (२४ मे) झालेल्या वादळी पावसामुळे नागपूर शहरातील 70 पेक्षा जास्त भागामध्ये झाडांची पडझड झाली, रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता मनपाच्या अग्निशमन विभाग आणि उद्यान विभागाच्या चमूने सर्व भागांमध्ये तात्काळरित्या मदतकार्य सुरू केले. हे कार्य अहोरात्र सुरू होते अनेक भागांमध्ये बुधवारी (२५ मे) सकाळपर्यंत कार्य सुरू राहिले. दोन्ही विभागांनी समन्वयाने केलेल्या कार्यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

पावसाळ्यात निर्माण होणा-या आपात्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज असून नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये सहकार्यासाठी मनपाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

          जी.पी.ओ. चौकातील माजी मंत्री रणजीत देशमुख यांच्या बंगल्यापुढे झाडाची मोठी फांदी कोसळली. ही फांदी हटवून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी अग्निशमन आणि उद्यान विभागाच्या चमूने बुधवारी (ता.२५) सकाळपर्यंत मदतकार्य केले. याशिवाय के.टी. नगर उद्यान जवळ, राम कुलर जवळ, गिट्टी खदान चौक, बिनाकी मंगळवारी, शिवाजी पुतळा दटके हॉस्पीटल जवळ, दटके हॉस्पीटल मागे कोतवाली रोड, सीताबर्डी पेट्रोल पम्प, शांतीनगर कॉलनी, आय.बी.एम.रोड मोठी मस्जीद जवळ, सी.आय.डी. ऑफीस जवळ, गिट्टीखदान पोलिस स्टेशन जवळ, जैवविविधता कार्यालय रोड, रामगिरी बंगला रोड वॉकर स्ट्रीट, रवीनगर क्वार्टर परिसर व रोड, पोलिस लाईन टाकळी पोलिस मुख्यालय डॉगी नेटजवळ, पोलिस उपायुक्त यांचा बंगला पोलिस मुख्रयालय, रमाईनगर उद्यान, लघुवेतन कॉलनी, जरीपटका जनता चौक, जागृती कॉलनी उद्यान, टी.व्ही. टॉवर चौक, उत्कृर्ष नगर नासुप्र उद्यान जवळ, जेल रोड रहाटे कॉलनी चौक, सदर मेट्रो ऑफीस मागील परिसरात अतिरिक्त आयुक्त यांचा बंगला, टेकानाका, इंदोरा पाण्याची टाकी, इंदोरा गल्ली नं. ५ या भागांमध्ये पडलेली झाडे आणि तुटलेल्या फांद्या हटविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. जरीपटका रिपलीक नगर येथे व जरीपटका चौधरी चौक येथे गाडी क्र.MH 49 U 3080 आणि गाडी क्र.MH 49 U 4775 वर झाड पडून नुकसान झाले. या दोन्ही गाडयांवरील पडलेले झाड मनपा अग्निशमन विभागाव्दारे बाजुला करुन दोन्ही गाडया बाहेर करण्यात आल्या.

कडूनिंबाच्या झाडाला मिळाले नवजीवन

वादळी पावसामुळे सेमीनरी हिल्स भागातील फॉरेस्ट डिपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथे कडूनिंबांचे झाड मुळासह उन्मळून पडले. या झाडाचे पुनर्रोपन करून उद्यान विभागाद्वारे झाडाला नवजीवन देण्याचे कार्य करण्यात आले. बुधवारी (ता.२५) सकाळपासून या कार्याला सुरूवात करून दुपारपर्यंत झाडाचे पुनर्रोपन करण्यात आले.

आपात्कालीन मदतीसाठी येथे संपर्क साधा

आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्यासाठी ०७१२ २५६७०२९, २५६७७७७, २५४०२९९, २५४०१८८ या क्रमांकांवर किंवा १०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्राच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा- उदय सामंत

Thu May 26 , 2022
109 वा पदवीदान दीक्षांत समारंभ  नागपूर :  विद्यार्थ्यांनी देशात करिअर घडवून आपल्या ज्ञानाचा उपयोग देश घडविण्यासाठी राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहन उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.             कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा  109 वा पदवीदान दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights