नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे रविवार, 18 डिसेंबरला नागपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे.
दुपारी 3 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कुटीर क्रमांक 9, रवी भवनकडे प्रयाण करतील. त्यानंतर रवीभवन येथून मोटारीने विधानभवनकडे प्रयाण करतील.दुपारी 4 वाजता सोमवार, 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर विधानभवन परिसराची पाहणी करतील. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती, उपाध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सुयोग पत्रकारांचे निवासस्थान व आमदार निवास येथे सदिच्छा भेट देतील. आमदार निवास येथून मोटारीने शासकीय निवासस्थान कुटीर क्रमांक 9, रवी भवनकडे प्रयाण करतील.