नवी दिल्ली :- 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.
या शपथविधीमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याच दिवशी संध्याकाळी आयोजित केलेल्या मेजवानी समारंभात देखील हे नेते उपस्थित राहणार आहेत.
शेजाऱ्यांना प्राधान्य हे धोरण आणि सागर हा दृष्टीकोन यांना भारताने दिलेले प्राधान्य विचारात घेऊन हे सर्व नेते, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.