संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणार्थ हजारो वीर शहीद झाले.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर मातृभूमीच्या रक्षणासाठी सिमेवर जवान डोळ्यात तेल घालून पहारा देतात आजवर अनेकांना वीरमरण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मातेच्या शहीद सुपुत्रांच्या स्मरणार्थ दिल्ली येथील कर्तव्यपथावर 35 एकरात अमृत वाटिका तयार करण्याचा बिडा उचलला.मेरी माटी मेरा देश या संकल्पनेतून ही वाटिका तयार होणार आहे. देशाच्या प्रत्येक गावातून माती संकलित करणे सुरू आहे. अनेक जाती,धर्म,पंथ असलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिकानी संकलित केलेली माती दिल्लीला पाठवणार आहेत या अभियानाने देशातील एकात्मतेचे दर्शन होणार असल्याचे मौलिक प्रतिपादन आमदार टेकचंद सावरकर यांनी केले.
ते कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या राज रॉयल सभागृहात कामठी तहसील कार्यालय, कामठी नगर परिषद तसेच कामठी पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत कलश संकलन मोहिमेत बोलत होते.
आझादी का अमृत मोहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्ग केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे पंचायत समिती कामठी ,नगर परिषद व कामठी तहसील च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार टेकचंद् सावरकर तसेच प्रामुख्याने तहसीलदार अक्षय पोयाम, मुख्याधिकारी संदीप बोरकर, बीडीओ प्रदीप गायगोले, सभापती दिशा चनकापुरे, उपसभापती दिलीप वंजारी, पंचायत समिती सदस्य उमेश रडके, सोनू कुथे, सुमेध रंगारी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कामठी तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत मधून अमृत कलश मध्ये आणलेली माती पंचायत समिती स्तरावर जमा करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर अमृत कलश यात्रा काढून सदर माती सरपंचांच्या हस्ते तालुका स्तरावर तयार करण्यात आलेल्या अमृत कलश मध्ये जमा करण्यात आली. त्यानंतर शाळेतील मुलांनी अनेक संस्कृतीक कार्यक्रम, नृत्य सादर केले. तसेच पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी अनेक देशभक्ती पर गाण्यांचा कार्यक्रमात सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी . प्रदीप गायगोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरोग्य विस्तार अधिकारी गोपिचंद कातुरे व कनिष्ठ प्रशासन अधिकारी अक्षयकुमार मंगरुळकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सुजित कुमार अढावू यांनी केले.