संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवीन कामठी भागातील प्रभाग 15 तिरंगा चौक रामगढ़ निवासी विशांत विनोदराव फुलझेले यांची सेन्ट्रल रेल्वे मधे निवड झाली असून त्यांना असिस्टेंट इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून बूटीबोरी रेल्वे स्टेशन येथे पहीली नियुक्ति देण्यात आली आहे.
विशांत फुलझेले अत्यंत सामान्य परिवारातील असून शनिवारी दुपारी कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी त्यांचा शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि भावी जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या या वेळी भाजपा पदाधिकारी अनिल निधान, अजय बोढ़ारे, संजय कनोजिया, माजी नगरसेविका संध्या रायबोले,विक्की बोंबले प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्वल सौलंकी,जितेंद्र खोब्रागडे, अवि गायकवाड,दिनेश खेडकर,शंकर चवरे, रोहित दहाट,बादल कठाने, अरविंद चवडे,अंकित बंसोड,विलास सिंगाडे, हर्ष धुर्वे, संजय पटले,मुन्नालाल खरोले,नरेश बर्वे,लालसिंग यादव,उज्वल रायबोले यांनी सहकार्य केले.