नागपूर :- गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शन नगर नागपूरच्या वतीने श्री क्षेत्र आदासा येथे ग्रामस्वच्छता अभियान अतंर्गत मंदिर परिसरात व गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविले. तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील वृध्दांना मंडळाच्या वतीने भोजन व वस्त्र देण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शन नगर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कृतिशिल कार्यक्रमाचे आयोजन करीत समाज प्रबोधनाचे कार्य करित आहे. नागपूर जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये जाऊन ग्राम स्वच्छता अभियान राबवून समाज प्रबोधनाचे कार्य करित आहे. ग्रामस्वच्छता अभियानाला मंडळाचे अध्यक्ष वसंतदासजी कुंभारे, उपाध्यक्ष राजेंद्र पितृडा, सचिव रमेश सोनकुसरे, प्राध्यापक रामदास टेकाडे, यादवराव चौधरी, रामराव डांगोरे, मधुकर राऊत,अरुण राऊत, सुभाष पराते, सतीश रायकवार, दामोदर मामुलकर, विजय गिरी, वसंता फरतोडे, कृष्णराव सांबारे, मनोहर हेडाऊ, झोडे यांचे सहकार्य लाभले. आदासा ग्रामनिवासी नंदू धवड, निलेश कडू, शेषरावजी धोटे सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.