आवाज ओबीसींचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
मनपा निवडणुकीत ओबीसी बांधवांना अधिक संधी देणार -आमदार विकास ठाकरे
नागपूर : शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग नागपूर व ग्रामीण च्यावतीने “आवाज ओबीसींचा ओबीसी मेळावा “कार्यक्रमाचे आयोजन जवाहर वस्तीगृह सिविल लाईन नागपूर येथे केंद्रीय अध्यक्ष ओबीसी विभाग कॅप्टन अजितसिंग यादव माजी मंत्री यांच्या हस्ते उद़घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भानुदास माळी ऊपस्थित होते तर प्रमुख पाहुणे सुनील केदार माजी मंत्री विकासभाऊ ठाकरे, आमदार व शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी, ॲड.अभिजित वंजारी आमदार विधान परिषद, अतुल लोंढे प्रदेश प्रवक्ता, सचिव गिरीष पांडव, संगीता तलमले उपस्थित होत्या. अँड.गोविंद भेंडारकर राष्ट्रीय समन्वयक यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक प्रा.अवंतिका लेकुरवाळे यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले की ओबिसी विभागाला स्वतंत्रपणे कार्य करायला बळ देवु व ओबिसीच्या समस्यां न्याय मिळावा याकरिता सरकार सोबत संघर्ष करू नागपुर ओबीसी विभागचे सहाही विधानसभा क्षेत्रामधे मोठे संघटन उभे केल्याने येणाऱ्या मनपा निवडणुकीत ओबिसी बांधवांना अधिक संधी देणार तसेच इतर आघाड्यानी पक्षबांधणी करिता कार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी अजयसिंह यादव, प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, आ.सुनिल केदार, ॲड अभिजीत वंजारी यांनी मनोगत व्येक्त केले तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन प्रकाश जानकर, संजय भिलकर, चंद़कांत हिंगे, धनराज मुंगले, धांडे ॲड.सूर्यकांत जयस्वाल, बाबुलाल कटरे, प्रफुल गुल्हाने, पांडुरंग धोटेकर, उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि प्रचंड संख्येने काँग्रेस ओबीसी कार्यकर्ता उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन नागपुर शहर जिल्हा कॉंग्रेस ओबिसी विभागचे शहर अध्यक्ष राजेश कुंभलकर व ग्रामिण अध्यक्षा प्रा.अवंतिका लेकुरवाळे यांनी केले तर आभार चंद्रकांत हिंगे यांनी मानले. कार्यक्रमाला मेळावामघ्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ओबीसींना लावण्यात आलेली नॉन क्रिमिलियर ची घटना बाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा. भारत सरकार मॅट्रिकवर शिष्यवृत्ती १००% देण्यात यावी. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे. लोकसंख्येच्या आधारावर एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गला जनगणनेच्या आधारावर आर्थिक निधीची तरतूद करण्यात यावी. ओबीसींना मिळणारे राजकीय आरक्षण हे अनुसूचित जाती, जमाती प्रमाणे घटनात्मक करावे. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गाला (EWS) देण्यात येणारे १०% आरक्षणात आदी ठराव मंजुर करण्यात आले. ओबीसी मेळावा यशस्वी करण्यासाठी माधवराव गावंडे, प्रशांत पवार, भुषण तल्हार, विलास बारसकर, संजय कडू, संतोष गोतफोडे, प्रकाश लायसे, अरविंद क्षीरसागर, आशिष काळे, नरेंद्र लिलारे, प्रभाकर भडके, प्रशांत ढोक, सुनिल भलमे शहर व ग्रमिण सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी अथ्थक परिश्रम घेतले. अशी माहिती महासचिव मोरेश्वर भादे यानी प्रसिद्दी पत्रात दिली.