विघ्नहर्ता सर्वांचे दु:ख दूर कर उपमुख्यमंत्र्यांची प्रार्थना

– विविध गणेश मंडळांना भेट

नागपूर :-  सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखाव्याद्वारे लोकोपयोगी योजना, ‘माझी माती, माझा देश’ अंतर्गत माती व तांदळे चा ‘अमृत कलश’ उपमुख्यमंत्री यांना भेट दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यंकर नगर बाल गणेश मंडळ, बजाज नगर एन.आय.टी. कॉटर्स येथील श्री बाल गणेश उत्सव मंडळ, राणी लक्ष्मी नगर गणेश मंडळ, तात्या टोपे नगर गणेश मंडळ, अत्रे लेआउट प्रताप नगर येथील साहस गणेशोत्सव मंडळ, उस्मान लेआउट गोपाल नगर येथील युवा संकल्प गणेश उत्सव मंडळ व त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ, प्रताप नगर चौक येथील बाल गणेशोत्सव मंडळ, लोकसेवा नगर येथील युवा गणेश उत्सव मंडळ, प्रियदर्शनी नगर येथील श्री विघ्नहर्ता बाल गणेशोत्सव मंडळ, त्रिमूर्ती नगर येथील युवक गणेश मंडळ, गुडलक सोसायटी जयताळा येथील नवयुवक गणेशोत्सव मंडळ, भेंडे लेआउट येथील श्री सिद्धिविनायक फाउंडेशन द्वारा संचालित श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, सोनेगाव एचबी ईस्टेट येथील श्री गणेश उत्सव मंडळ, गोविंद नगर व जयप्रकाश नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रामेश्वरी येथील सर्वोदय गणेशोत्सव मंडळ, भगवान नगर येथील युवा गणेशोत्सव मंडळ आदी गणेश मंडळांना भेट दिली व श्री गणेशाचे दर्शन घेवून आरती केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी निवडणुकीत कोणते मतदान केंद्र कुठे,२६ सप्टेंबर पर्यंत बदलाचे प्रारूप उपलब्ध

Mon Sep 25 , 2023
– राजकीय पक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा नागपूर :- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांमध्ये झालेला बदल नजरेखालून घालण्यासाठी मंगळवार पर्यंतची मुदत मान्यता प्राप्त राजकीय पक्षासाठी ठेवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभागात २६ सप्टेंबर पर्यंत आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघामध्ये काही मतदान केंद्र बदलले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!