नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या ११ जानेवारी २०२३ च्या अधिसुचनेनुसार नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर विभागात ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ आहे.
आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या पाच जिल्हयात ( गडचिरोली वगळता ) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्हयात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
२ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.