बाळासाहेब ठाकरेंच्या वैचारिक वारसदारांचा विजय – जयदीप कवाडे

– आदित्य ठाकरेंनीच अंबाझरी आंबेडकर भवनाची वास्तू पाडली

मुंबई/नागपुर :- संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर योग्य निर्णय दिला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून म्हणून आपण त्यांच्या पक्षाला मान्यता देत असल्याचा ऐतिहासिक निर्णय अध्यक्षांनी दिला असून हे स्वागतार्ह आहे. खरे म्हणजे, हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वैचारिक विचारांना पुढे नेणारे खरे वारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विजय आहे. या निर्णयाने बाळासाहेबांना अभिप्रेत असलेल्या शिवसेना आता ताकदीने महाराष्ट्रात जोमाने समाजभिमूख कार्य करणार असल्याचे मत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी आज मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. पुढे बोलताना जयदिप कवाडे म्हणाले की, देशात सामाजिक क्रांती घडवून आणणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची नागपूरातील एक ऐतिहासिक आठवण असलेली वास्तू उद्धवस्त करण्याचे पाप महाविकास आघाडीने केले आहे, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या आदेशावरूनच बाबासाहेबांची वास्तू पाडण्यात आले. असा थेट आरोप जयदीप कवाडे यांनी केला. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने भवन पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिले होते. २०१७ ला महानगर पालिकेने ही वास्तू महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली होती. असे असताना कुणाच्या सांगण्यावरून ही वास्तू नेस्तनाभूत करण्यात आली होती? त्यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा याप्रकरणाशी काय संबंध होता? असे सवालही जयदिप कवाडेंनी उपस्थित केले.

वास्तू पाडण्याचे आदेश आदित्य ठाकरेंनी दिला

ही वास्तू पाडण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांच्याकडूनच देण्यात आले होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमिवर लाखो बांधवांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्मदीक्षा सोहळ्यानंतर बाबासाहेबांचा नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरी सत्कार करण्यात आला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापालिकेने १९७५ साली अंबाझरी उद्यानाजवळ १८.८६ एकर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासून हे भवन आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू बनले होते. पंरतु, हे भवन पाडणारे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने आंबेडकरी अनुयायांचे मन दुखावले. आंबेडकरी चळवळीच्या रोषाचा सामना ठाकरेंना सर्वस्तरातून होत आहे, म्हणूनच आमदार अपात्रतेत आजच्या निकालातून अधिक स्पष्टता आली आहे, असेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला ती उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस झाली. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाशी गद्दारी केली म्हणून एकनाथ शिंदे यांनी खरा शिवसेनेचा वैचारिक वारसा पुढे नेत असल्यामुळेच आज त्यांच्या बाजूने निकाल आला आहे असेही जयदीप कवाडे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बॅटरी चोरट्याकडून इतर 9 चोरीचे गुन्हे उघडकीस

Thu Jan 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या कपिल नगर पोलिसांनी उप्पलवाडी येथील प्लॅटिनम पोलिपेक शेड च्या बंद गोडाऊन मधून 76 ई रिक्षा च्या 12 व्होल्ट च्या चोरीस गेलेल्या बॅटरी च्या गुन्ह्यात चार आरोपीना अटक करण्याची यशस्वी कारवाही नुकतेच केली असून हे तिन्ही आरोपी इतर 9 चोरीच्या गुन्हयात अडकले असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!