कन्हान गोळीबार प्रकरणात वेकोलि सुरक्षा कर्मचारी चा उपचार दरम्यान मृत्यु

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा येथे इंदिर काॅलरी मॅनेजर आफिसच्या मागे भर दिवसा दोन आरोपींनी वाद विवाद करुन वेकोलीच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याला गंभीर जख्मी केले असता त्यास उपचार करिता कामठी येथील आशा हाॅस्पीटल येथे भर्ती केले असता सुरक्षा कर्मचारीचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यान मध्ये शोक चे वातावरण निर्माण झाले आहे .

सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान महा.सुरक्षा रक्षक मिलिंद खोब्रागडे वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजन काटयाजवळ पेट्रोलिंग करित होता . त्याचे मागे थोड्या अंतरावर महेश वामनराव नासरे वय ३४ वर्ष ह.मु. सीएमपीडी आई कॅंम्प सब एरीया ऑफिस काॅलोनी खदान नं ३ सह राहुल बेलखुडे व शमीक असे तीघे पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा आरोपी समीर सिद्दीकी व राहुल जेकब हे होंडा सीडी डिलेक्स क्रमांक एम एच ४० – आर – ६२७२ दुचाकी ने मॅनेजर रूम मागुन प्रतिबंधित क्षेत्रात कोल डेपो कडे जात असल्याने मिलींद खोब्रागडे याने त्यांना पुढे जाण्यास मनाई केली . त्या दोघांनी मिलींद खोब्रागडे शासकीय कर्तव्य बजावित असतांना त्याचे सोबत शिविगाळ करून धक्काबुक्की केली आणि आरोपी समीर सिद्दीकी याने त्याचे जवळील देशी माऊजर काढुन मिलींद खोब्रागडे च्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडुन कमरे वर मारल्याने तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर तिसरी गोळी मारून गंभीर जखमी केले.

काही वेळातच महेश नासरे यांनी लगेच ऑफिस मधील गार्ड सोनु देविया यास बोलावुन ऑफिसच्या गाडीने मिलींद खोब्रागडे ला गाडीत टाकुन उपचारा करीता जे.एन दवाखाना कांद्री-कन्हान येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यास रेफर केल्याने खाजगी आशा हॉस्पीटल कामठी येथे दाखल केले होते .

सोमवार दि.१२ ला मिलींद याची शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली आणि पुढील उपचार सुरू असुन मिलींद सध्या ही झुंज देत असल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात होते .

बुधवार दिनांक १४ ला रात्री च्या दरम्यान कामठी येथील आशा हाॅस्पीटल येथे वेकोलि सुरक्षा कर्मचारी मिलिंद खोब्रागडे चा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यान मध्ये शोक चे वातावरण निर्माण झाले आहे .

सदर प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वयेशन शाखा नागपुर ग्रामीण पथक व कन्हान पोलीसांनी आरोपी समीर सिद्धिकी व राहुल जेकब यांस ताब्यात घेऊन फिर्यादी महेश नासरे यांचा तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३०७ , ३५३ भादंवी ३/२५ ऑर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि हत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे

सोमवार (दि.१२) कामठी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधिशांनी दोन्ही आरोपी चा तीन दिवसाचा म्हणजे गुरुवार दि.१५ पर्यंत कन्हान पोलीसांना पुढील तपासा करिता पीसीआर दिला आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे आणि त्यात राज्यसरकारने हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे - अजित पवार

Thu Dec 15 , 2022
राज्यातील सध्याचे सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करत आहे… आताचे राज्यसरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे… प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?… मुंबई  – अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!