नागपूर :-फिर्यादी दुर्गेश अरूणराव कोळमकर वय ४० वर्ष रा. गायकवाड ले-आऊट, ब्राम्हणी, कळमेश्वर, जि. नागपूर हे एच.डी. एफ.सी बँक येथे एटीएम ऑफीसर महणून नोकरीला आहे. दिनांक ०१.१२.२०२४ थे ०१.२० वा. ते ०१.५० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे पारडी हद्दीतील अवचट बिल्डींग येथील एच. डी.एफ.सी बँकेचे एटीएम मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने एटीएम मधील कॅश चोरून नेण्याचे उद्देशाने छेडछाड करून एटीएमचे लाखंडी चाकुने नुकसान केले. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे पारडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२), ३२४, ६२ भा.न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पारडी पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहिती वरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे रितीक उर्फ जाबो केशवराव घवघवे वय २४ वर्ष रा. महाराजपूरा, सुमीत आटा चक्की जवळ, पारडी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपीस अटक करून त्याचे ताब्यातुन एक लोखंडी याकु ५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. के. ५), विशाल क्षिरसागर, सहा. पोलीस आयुक्त (कामठी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. रंजीत सिरसाठ, पोउपनि अरविंद कोल्हारे, हनुमंत इंगळे, पोहवा. नितीन बोबडे, दिलीप अवगान, पोअं, गौरव युवते, आशिक रामटेके, राकेश वासनीक व उपेन्द्र यादव यांनी केली.