नागपूर :- पो. ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ३० एन. आय. टी गार्डन मागे, प्रियदर्शनी नगर येथे राहणारे फिर्यादी रामसुरज रमापती विश्वकर्मा वय २६ वर्ष यांनी त्यांची दुचाकी वाहन लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे प्रतापनगर येथे अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता.
गुन्हयाचे संमातर तपासात गुन्हे शाखा युनिट १ अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती वरून सापळा रचून आरोपी अनिल रामकुमार पटेल, वय २४ वर्ष, रा. महुगंज, पारल जि. रिवा. म. प्र. ह. मु. सोनेगाव तलाव मांगे शिवपूरी गजाननधाम झोपडपट्टी येथे किरायाने, सोनेगाव यास ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपीने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच आरोपी हा पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीतील ईतर तिन वाहन चोरीचे गुन्हयात गुन्हा केल्यापासून पाहिजे आरोपी होता. मिळून येत नव्हता, आरोपीस पुढील कार्यवाहीस्तव प्रतापनगर पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. अनिल ताकसांडे, सपोनि राजेन्द्र गुप्ता, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा विनोद देशमुख, नापोअ रितेश तुमडाम, शुशत सोळंके, मनोज टेकाम, सुनीत गुजर, चंद्रशेखर भारती व रविंद्र राउत यांनी केली आहे.