यवतमाळ :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जुने व निरुपयोगी वाहने अंतिम विल्हेवाट लावण्याकरिता इच्छुक खरेदीदारांनी www.mstcecommerce.com/elv या संकेतस्थळावर दि. 21 मार्च रोजी नोंदणी असलेल्या सर्व बोलीदारांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांर्गत जप्त केलेल्या वाहनांच्या जाहिर ई-लिलाव पध्दतीने दिनांक 21 मार्च रोजी करण्यात येत आहे. वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, यवतमाळ येथील आवारात कार्यालयीन वेळेमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
या कार्यालयातील वायुवेग पथकातील वेळोवेळी विविध गुन्ह्याखालील अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर नोटीस पाठविण्यात आलेल्या आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असतांना देखिल सदर वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळवले नाही.
जाहिर ई-लिलावात एकूण 21 वाहने उपलब्ध आहेत. यामध्ये बस, ट्रक, टॅक्सी, हलकी मालवाहू वाहने व ऑटोरिक्षा इत्यादी वाहनांचा सामावेश आहे. वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी दिनांक दि.13 मार्च पर्यंत वाहन मालकांना होती.
ई-लिलावाच्या अटी व नियम www.mstcecommerce.com/elv या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाहने जशी आहे तशी या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जातील. कोणतेही कारण न देता सदर जाहिर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राखून ठेवले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी कळविले आहे.