नमाद महाविधालयात पोलीस स्मृती दिवसानिमित्त वीर मातेचा सन्मान

गोंदिया :- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने पोलीस स्मृती दिनानिमित्त नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मातेचा, वीर मातेचा सन्मान करण्यात आला.

संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात पोलीस स्मृती दिनानिमित्त ८ नोव्हेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना नक्षली हल्ल्यात शहीद झालेले संजीव धोंडोजीं कावरे व ३० मे २००५ रोजी सालेकसा तालुक्यात शहीद झालेले रवीकुमार सेवकराम जौंजाळ या शहीद झालेल्या जवानांच्या वीर मातेच्या सत्कार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून वीर माता कमला कावरे, रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे उपस्थित होते. २ कार्यक्रमाला उपस्थित शहीद वीर संजीव धोंडोजीं कावरे यांच्या आई, वीर माता मलाबाई कावरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वीर शहीद संजीव धोंडोजीं कावरे, व रवीकुमार सेवकराम जौंजाळ यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. एक मिनिट मौन पाळून श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे यांनी पोलीस स्मृती दिवस का आणि कधी साजरा केला जातो याची माहिती सांगितली. २१ ऑक्टोबर १९५९ मध्ये भारत चीन सीमेवर चीन सैनिकांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे १० जवान शहीद झाले. तेव्हापासून म्हणजे २१ ऑक्टोबर १९६० पासून शहीद जवानांच्या स्मृतीनिमित्त पोलीस स्मृती दिवस पाळण्यात येतो. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. महाजन म्हणाल्या, आपण आपल्या इच्छा, आकांक्षा जर देशासाठी अर्पण केल्या तर जीवन देश सेवेस अर्पण होते. परंतु प्रत्येकालाच सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याचे भाग्य मिळत नाही. आपण सामान्य नागरिक म्हणून स्वच्छता मोहिमेत सहभागी परिसर स्वच्छ, नीट आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी पार पडली तरी देशसेवा घडते. त्यामुळे प्रत्येकाने, खास करून युवकांनी, ज्यांना देशाच्या रक्षणासाठी वर्दी धारण करण्याची संधी मिळत नाही, अशा युवकांनी देशसेवेचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्या महाजन यांनी केले. कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या डॉ. एस यु खान, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मोहतुरे, डॉ. बबन मेश्राम, डॉ. अंबादास बाकरे, डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. प्रियदर्शनी नंदेश्वर, प्रा. घनशाम गेडेकर, प्रा. प्रणव वासनिक उपस्थित होते. जण गण मन या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रणिता तुरकर, प्रास्ताविक डॉ.एच पी पारधी तर आभार डॉ. योगराज बैस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor greets people on Vijaya Dashmi

Tue Oct 24 , 2023
Mumbai :- The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the auspicious occasion of Vijaya Dashmi (Dassera). In his message, the Governor has said: “The festival of Vijaya Dashmi or Dussera symbolizes the victory of the eternal over the ephemeral and of good over the forces of evil. The festival reassures that Truth will always […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com