संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
– “आ नचले” एकल नृत्य स्पर्धेत बालनृत्यकांची चुरस..
– बालकलाकारांचे कौशल्य विकसित करणे हाच संस्थेचा एकमेव ध्यास :आकाश वानखेडे
नागपूर/०३ जाणे :-बुटीबोरीच्या विकासाचा ध्यास मनाशी बाळगणारे,जनसामान्यांच्या सुख दुःखात धावून जाणारे,प्रत्येक गरजवंताला मदतीचा हाथ देणारे व संपूर्ण बुटीबोरीकरांच्या काळजात घर करून राहणारे विकासपुरुष,निडर नेते स्व.किशोरभाऊ वानखेडे यांच्या ६२ व्या जयंती निमित्त स्व.किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.त्यात रक्तदान शिबिर,स्पॉट पेंटिंग स्पर्धा व “आ नचले” एकल नृत्य स्पर्धेचा समावेश होता. स्व किशोर वानखेडे यांनी बुटीबोरी च्या विकासा करिता दिलेले योगदान येणाऱ्या पिढ्यांना स्मरणात राहावे व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी दि २९ डिसें ला दुर्गा मंदिर येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जीवणज्योति ब्लड बँकेने रक्त संकलन केले.दि.१ जाणे २०२३ रोजी आई लॉन प्रभाग क्रमांक ७ बुटीबोरी येथे भव्य दिव्य प्रकाश झोतात “आ नाचले” ही एकल नृत्य स्पर्धा पार पडली यामध्ये परिसरातील दुरवरून आलेल्या अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धेत ८४ स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यापैकी १३ स्पर्धकांची अंतिम फेरी करिता निवड करण्यात आली होती.स्पर्धेत प्रथम पुरस्कार मैथिली पांडे(वणी),द्वितीय पुरस्कार संयुक्ता ढवळे तृतीय पुरस्कार मयुरी धोपटे (बुटीबोरी) व ३ स्पर्धकांनी प्रोत्साहन पुरस्कार पटकावले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून अलिस्टर अँथोनी व सूचना बंगाले उपस्थित होते.प्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने,संस्थेचे अध्यक्ष आकाश दादा वानखेडे,बुटीबोरी नगराध्यक्ष बबलू गौतम,उपाध्यक्ष अविनाश गुर्जर,महेंद्र सिंह चौहान बुटीबोरी नगरपरिषदेचे सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुमित मेंढे व ऋषी जयस्वाल यांनी केले.
स्पॉट पेंटिंग चित्रकला स्पर्धत प्रथम पुरस्कार संवेद कबाडे,द्वितीय पुरस्कार रोशनी घाटे,तृतीय पुरस्कार स्नेहा ठाकरे यांनी पटकावले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुमित मेंढे, महेश पटले, सचिन चंदेल,ऋषी जैस्वाल,अक्षय कुबेर,अंकित भोयर, विनोद मोहोड,दीपक बन,रुपेश इचकाटे,नयन गुल्हणे, हरीश क्षीरसागर,तेजस भोयर,ओम आंबटकर,विक्की बारसागडे,पार्थ वानखेडे,अंकुश चतुर्वेदी,सफल रामटेके,पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे यांनी परिश्रम घेतले.
परिसरातील युवा व बाल कलाकारांचे कौशल्य विकसित करणे हाच स्व किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्थेचा एकमेव ध्यास असून त्याकरिता आम्ही संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी मंच उपलब्ध करून देऊ.
आकाश वानखेडे,अध्यक्ष,स्व किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था,बुटीबोरी