अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक

बुट्टीबोरी :- दिनांक २५/०५/२०२३ च्या ११.३० वा. दरम्यान यातील फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलगी वय ११ वर्ष ही तिचे राहते घरात पलंगावर लेटली असतांना यातील नमूद आरोपी नामे- सचिन नामदेव कुकडे वय ३९ वर्ष, रा. बोरखेडी फाटक सुतगिरणी ता. जि. नागपूर तिथे पिडीतेचे घरात शिरून हा बनियान टॉवेल वर घरात आला व त्याने दरवाजा बंद करून यातील पिडीता ही एकटी घरी हजर असतांना घरात शिरला त्यावेळी अल्पवयीन पिडीता ही ओरडली असता त्यावेळी यातील आरोपीने तिचे तोंड दाबुन तिचेवर लैंगिक अत्याचार केला व कोणाला काही सांगशील तर मारून टाकीन अशी धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. बुट्टीबोरी येथे आरोपीविरुध्द कलम ३७६ (एबी), ३७६(३), ४५२, ५०६ भादवि. सहकलम ४, ६ पोस्को अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पूजा गायकवाड एसडीपिओ एनडी  या करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com