जी 20 परिषदेच्या निमित्ताने पुणे शहर सौंदर्यकरणाचे विविध उपक्रम

– पुणे ते पंढरपूर सायकल रॅलीचा शुभारंभ

पुणे :- यंदा पुणे शहरामध्ये जी 20 परिषदेनिमित्त विविध देशांचे सन्माननीय पाहुणे येणार आहेत त्या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यकरणाचे विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. या परिषदेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा आज महापालिका भवना पासून शुभारंभ झाला .पुणे ते पंढरपूर या सुमारे 250 किलोमिटर मार्गावर ही रॅली प्रवास करणार असून जी 20 परिषदे बरोबरच पर्यावरण विषयक जन जागृती करणार आहे . मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण देखील केले जाणार आहे.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेडयात 1 लक्ष 47 हजार 600 रुपयाची घरफोडी

Fri Jun 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील भारत टाऊन परिसरातील एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने अवैधरीत्या प्रवेश करून घरातून नगदी 20 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 47 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी कैलास उज्जैनवार वय 63 वर्षे रा प्लॉट नं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com