मतदार जनजागृतीवर भर देणारे विविध उपक्रम राबवावे – आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

– विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

नागपूर :- निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून, यात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे, याची जाणीव करून देणारे आणि मतदार जनजागृती वर भर देणारे विविध उपक्रम नागपूर महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन झोन निहाय राबबावे अशा सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता: २३) दिल्या.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या पूर्वतयारी बाबतचा आढावा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयोजित बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अजय चारठाणकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, गणेश राठोड, सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, विजय थूल, नरेंद्र बावनकर, हरीश राऊत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, नगर रचना उपसंचालक डॉ. ऋतुराज जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यांनी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने करावे, मनपाच्या दहाही झोन निहाय मतदार जागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रमांचे योग्य नियोजन करावे, नियोजनाचे वेळापत्रक तयार करून घ्यावे, लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या मतदार संघात कमी प्रमाणात मतदान झाले असेल अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नागरिकांना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, शहरातील दर्शनीय भागात मतदान जागृती फलक लावावेत, युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी फ्लॅश मॉब व पथनाट्य, विविध स्पर्धा आयोजित कराव्यात, मॉल, रुग्णालय, बाजारपेठेत, महाविद्यालयात विविध जनजागृती उपक्रम राबवावेत, शहराच्या विविध भागात “मतदानांचा उत्सावात” साजरा करण्यासाठी बाईक रॅली, प्रभात फेरी काढण्यात याव्या, सर्व विधानसभा मतदार संघात अधिकाधिक मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, हॉटेल, सोसायटी, उंच इमारतीमध्ये नागरिकांना मतदान करण्याचे निवेदन करावे, महाविद्यालय, शाळा आदी ठिकाणी नागरिकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घ्यावे, नागरिकांना मतदान करण्यासाठी मनपाच्या कचरा संकलन वाहनांवरून ध्वनीचित्रफित वाजवीत आवाहन करावे, आदी सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अजय चारठाणकर यांनी मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग स्वीप कर्यक्रम नागपूर शहरीभागात यशस्वीरीत्या राबविण्याबाबत ची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फ्लॅटची चाबी देण्याच्या बदल्यात, एक कोटी रुपयांची मागणी, हुडकेश्वर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

Thu Oct 24 , 2024
नागपूर :- पोलीस हवालदार आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजा चिखली (खुर्द) खसरा क्रमांक 23 मध्ये श्री संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांनी आखलेल्या ले-आउट मधील भूखंड क्रमांक 32 हा सगळे मिळून आममुखत्यार पत्र व बांधकामाचा विकास करारनामा रजिस्टर्ड केलेला होता आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com