वराडा एम एच के एस पेट्रोल पंप जवळ ट्रक पलटला, कुठलीही जीवहानी नाही
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील वराडा शिवारात एम एच के एस पेट्रोल पंप जवळ नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर एक ट्रक पलटल्याने काही वेळा करिता वाहतुक खोळबंली होती. या अप घातात कुठलीही जीवहानी झाली नाही.
        प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२८) फेब्रुवारी ला पहाटे सकाळी ट्रक चालक हा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये माचीस चा माल घेऊन नागपुर वरून जबल पुर कडे जात असतांना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चार पदरी महामार्गा वरील वराडा शिवारात एम एच के एस पेट्रोल पंप जवळ ट्रक चालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला. या अपघातात कुठलीही जीव हानी झाली नसुन मोठा अपघात टळला. राष्ट्रीय महा मार्गा वर ट्रक पलटल्याने काही वेळा करिता वाहनाची चाके थांबुन वाहतुक खोळबंल्याने महामार्ग वाहतुक  पोलीस कर्मचाऱ्यांनी व ओरिंटिएल टोल नाक्याचा पथकांनी पलटलेला ट्रक उचलुन बाजुला ला लावुन वाहतुक सुरळीत केल्याने प्रवाशी नागरिकांना दिलाशा
 मिळाला.
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com