नागपूर :- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी ही या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. आज या मागणीला मूर्त रूप आले आहे.मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारतची ट्रेन ही मोलाची उपलब्धी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
राज्यपाल म्हणाले, नागपूर व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक विकास व्हावा असा प्रयत्न आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.