गाण्याच्या तालावर रोवणीने बहरला कामठी तालुका

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 – नुकत्याच झालेल्या संततधार दमदार पावसाने कामठी तालुक्यातील बळीराजानि शेतात धानपरहे भरणी तसेच रोवणीच्या कामाला गती दिली असून बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे तसेच ग्रामीण भागातील महिला आपल्या सुंदर सुरेल गोड आवाजात गाणी गात एकदम शेत हे बहरवून टाकले व शेवटी गाण्याच्या तालावर कामठी तालुका बहरल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.

मागील काही वर्षांपासून बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली आहे . यावर्षी पीकपाणी चांगले हातात लागेल , कर्जाचे ओझे खाली होईल या नव्या उमेदीने बळीराजा शेती कामात व्यस्त झाला आहे .
तालुक्यात सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच आपल्या शेतात धान परहे भरणी केली होती त्यांचे धानपरहे आता लागवड करण्यायोग्य सुद्धा झालेले आहेत तर काही कोरडवाहू शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धनपरह्याची धुळफेकणी केली आता तालुक्यात रोवणी योग्य दमदार पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी धांरोवणीच्या कामाला प्रारंभ केला आहे त्यामूळे शेतात शेतकरी शेतमजुरांची गर्दी दिसायला लागली आहे.
शेतात ‘उट उट पाकुरा जा माझ्या माहेरा!!केवळ मोठा गुणवान, कोठाबाई राबवित मन!केवळ बोले …हो..केवळ बोले!या ओळीप्रमाणे ग्रामीण भागातील महिला मजुरीने शेतात रोवणीच्या काम करत आहेत .आपली करमणूक व्हावी म्हणून या प्रकारचे गाणी गातात अशी चलन आहे. तर धान रोवणी कामास प्रारंभ झाल्याने शेतकरी सुखावला आहे .वास्तविकता रोवणी संपल्यावर चिखल पूजा करतात , रोवण्यातील सहभागी प्रत्येक जण चिखल लावतात शेतामधून डपळी वाद्याने डपळीच्या तालावर गाणी म्हणत म्हणत शेत मालकाच्या घराकडे येतात तेव्हा परंपरेने खांद्यावर नांगर, हातात जुपणा, तुपारी, फन अशा साधना समादीत गीत गात बळीराजाच्या घरी येतात हे इथं विशेष !
-मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कामठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्याची शेती पाण्याखाली गेली.ज्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची स्थिती आहे.दरम्यान ज्या शेतकऱ्यानी या काळात धान पिकाची रोवणी केली त्या अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पाण्याखाली राहल्याने धान पिकाचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांचे धान पीक पऱ्हेही वाहुन गेल्याचे सांगण्यात येते.एकंदरोत या मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले असले तरी आता पुन्हा शेतकरी हंगामाच्या कामाला लागल्याचे दिसून येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तिरोडा शहर की समस्याओं को लेकर पूर्व विधायक दिलीप बंसोड़ के नेतृत्व में कॉंग्रेस ने मुख्याधिकारी को सौपा निवेदन

Tue Jul 19 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  तिरोडा – पूर्व विधायक एवम कोंग्रेस के जिलाध्यक्ष दिलीप बंसोड के नेतृत्व में तिरोडा शहर की नागरिकों से जुड़ी समस्याओं को लेकर शहर कॉंग्रेस कमेटी ने अनेको नागरिकों के साथ तिरोडा नगर परिषद पहुँचकर मुख्याधिकारी करण चौहान को निवेदन सौपा और नगर परिषद की कार्यप्रणाली पर रौष व्यक्त करते हुए नगरपालिका के अधिकारियों की कार्यशैली के खिलाफ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com