उत्तरप्रदेश च्या सराईत गुन्हेगासरास कामठी तुन अटक

– संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 22:- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहरात कित्येकच परराज्योय नागरिक शह घेऊन वास्तव्यास आहेत या परराज्यीय नागरिकांची कामठी पोलीस स्टेशन च्या अखत्यारीत कुठलीच नोंद नाही वास्तविकता परराज्य तसेच बाहेरून कामठीत वास्तव्यास आलेल्या नागरिकांना कामठी पोलीस स्टेशन मध्ये नोंद करणे क्रमप्राप्त आहे मात्र येथील पोलीस विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कित्येकच परराज्यीय नागरिकांसह सराईत गुन्हेगार वास्तव्यास आहेत ज्याची प्रचिती नवीन कामठी पोलिसांनी आज केलेल्या कारवाहीतुन दिसून येते.यानुसार उत्तरप्रदेश राज्यातील आगरा जिल्ह्यातून कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतुन एका स्वर्णकार दुकानात काम करणाऱ्या कारागीर चा हात चालाखीने , अगरबत्तीचा वास देऊन बुवाबाजी करून त्याच्या हातातील 27 किलो 250 ग्रा ची चांदीची थैली घेऊन फसवणूक करीत पळ काढनाऱ्या आरोपीने महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात शह घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित या प्रकरणाचा छडा लावीत आरोपीस अटक केले असून अटक आरोपीचे नाव सलीम अली मेहंदी अली वय 60 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगरा जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका स्वर्णकार व्यापाऱ्याने दुकानात काम करणाऱ्या कारागिरला चांदी साफ करून आणण्याचे संगीतल्यावरून कारागीर फिर्यादी सौरभ गर्ग वय 27 वर्षे रा आगरा याने 11 नोव्हेंबर 2021 ला सकाळी दुपारी 12 दरम्यान मालकाने दिलेली 27 किलो 250 ग्रा ची चांदीने भरलेली थैली घेऊन जात असताना आरोपी 60 वर्षीय सलीम अली ने सदर घटनास्थळी थांबवून गोष्टीत भुलवून त्यास अगरबत्तीचा वास देऊन हात चलाखीने हातात असलेली 27 किलो 250 ग्राम चांदी हिसकावून पळ काढला.सदर घटनेसंदर्भात आग्रा पोलिसांनी तांत्रिक माध्यमाद्वारे एका मोबाईल नम्बर वरून शोध घेत पोलिसांनी गुन्ह्याची गंभीर्यता पाहून फुटेजवरून सदर मोबाईल नंबर चर आधारे पथकाने एकूण 4 आरोपी निष्पन्न करून आरोपी हे येरखेडा येथे राहणारे सलीम अली, सज्जद अली, अदनान अली, गुलाम रजा असल्याचे निष्पन्न झाल्यावरून गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती वरून आरोपीचे राहत्या घरी धाड घातले असता आरोपी सलीम अली मेहंदी अली ला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आले .सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीस 2 दिवसाचा ट्रान्झिस्ट रिमांड सूनावला तसेच अटक आरोपी हा गुन्ह्याचा मास्टर माईंड असून त्याचे विरुद्ध देशात व इतर ठिकाणी सुदधा गुन्हे दाखल आहेत तर ह्या सराईत गुन्हेगारास कामठी तुन अटक करण्यात आल्याची यशस्वी कारवाही डीसीपी मनीष कलवानिया, एसीपी नयन अलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्य मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, संतोष ठाकूर,संदीप सगणे, निलेश यादव, ललित शेंडे, हर्षद वासनिक, सुरेंद्र शेंडे, कमल कनोजिया, संदेश शुक्ला, संगीता पाल यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

टेकाडी, गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रेेचे प्रस्थान

Thu Feb 24 , 2022
 विविध ठिकाणी श्रीराम भक्तांनी फुलाच्या वर्षावाने केले भव्य स्वागत.    कन्हान : –  शहरा पासुन ३ किमी अंतरावर असलेल्या टेकाडी गावातुन दरवर्षी प्रमाणे टेकाडी, गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पायी पदयात्रा श्री हनुमान मंदीर टेकाडी ला महाआरती व प्रसाद वितरण करून गाव भ्रमण करित टेकाडी येथुन जामसावळी पदयात्रेचे रस्त्यात  विविध ठिकाणी श्रीराम व श्री हनुमान भक्तांनी फुला च्या वर्षाव, चाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com