– एक युवक व विधीसंघर्ष बालकावर कारवाई.
कन्हान :- मोबाईल व्दारे सोशल मिडीयावर तलवारी सह फोटो अपलोड केल्याने पोलीसानी कोळसा खदान नं.६ येथील विधीसंधर्ष बालक व फरार राजेद्र कश्यप रा. खदान न ६ यांचे विरूध्द अवैधरीत्या विना परवाना धारदार तलवार बाळगल्याने त्यांचे विरूध्द कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
सपोनि राहुल चव्हाण पोलीस कर्मचा-या सह शासकिय वाहनाने (दि.२९) नोहेंबर २०२४ ला पो.स्टे. कन्हान हदीत खदान न ६ परिसरात पेट्रोलीग करीत असता गोपनीय माहीत मिळाली की, यश या मुलाने आपले मोबाईल व्दारे सोशल मिडीयावर तलवारी सह फोटो अपलोड केले आहे अशा माहीतीवरून पडताळ णी करणे कामी पंचासह रवाना झाले असता खदान क ६ येथे जावुन यश बद्दल विचारपुस करून त्याचे घरी गेले असता यश मिळून आला. त्यास नाव गाव विचारून त्यास सोशल मिडीयावरील तलवारीसह फोटो बाबत विचारले आणि तलवार काढून देण्यास सांगितले तेव्हा ती तलवार मित्र राजेद्र कश्यप रा. खदान न.६ याचे घरी ठेवली आहे असे सांगितले. तेव्हा बालकास सोबत घेवून पंचासह राजेद्र कश्यप रा . खंदान न.६ यांचे घरी जावुन पाहणी केली असता राजेद्र कश्यप घरी हजर नव्हता. पंचासमक्ष घर झडती घेतली असता घरात सिमेट ओटया मध्ये एक धारदार तलवार दिसुन आल्याने विचारपुस केली असता तल वार आम्ही दोघांनी विकत घेतल्याचे विधी संघर्ष बाल कांनी सांगितल्याने मौक्यावर पंचासमक्ष एक स्ट्रीलची धारदार तलवार जिची लांबी ३५.५ इच प्लास्टीकची तूटलेली मुठ लांबी १० इंच, पात्याची लांबी २५.०६ इंच व धारदार पात्याची रूदी २ इंच अंदाजे किमत ८००/रू अशा वर्णनाची तलवार जप्त करून सदर विधीसंधर्ष बालक व फरार राजेद्र कश्यप रा. खदान न ६ यांचे कृत्य हे अवैधरीत्या बिनापरवाना धारदार तल वार बाळगल्याने त्यांचे विरूध्द कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात स.पो.नी. राहुल चव्हान सोबत पोउपनी एकनाथ राठोड, पोना अमोल नागरे, पोना महेश बिसने, मपोशि रूपाली तिडके सर्व पोस्टे कन्हान हयानी पार पाडली