मलजलवाहिनी आणि जलवाहिन्यांचा मास्टर प्लॉन अद्ययावत करा

– ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश 

– विविध समस्यांचा घेतला आढावा

नागपूर :- नागपूर शहराचा होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यादृष्टीने शहरातील मलजलवाहिनी तसेच जलवाहिन्यांचा तयार असलेला मास्टर प्लॉन अद्ययावत करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपूर शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा मुख्यालयात शुक्रवारी (ता.६) बैठक घेतली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बैठकीत आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्यासह मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठ्यासंदर्भातील समस्यांवर चर्चा करताना जलप्रदाय विभागाद्वारे माहिती सादर करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत नागपूर शहरातील विविध भागांमध्ये ३१ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. या क्षेत्रामध्ये जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम पूर्ण करून लवकरच नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. अमृत योजनेमुळे नागपूर शहरातील टँकरने पाणी पुरवठ्या संख्या दिवसेंदिवस कमी होत असून लवकरच शहर टँकरमुक्त होईल, असा विश्वास यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. जलवाहिन्यांच्या जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्यानंतर रस्त्या सुव्यवस्थित व्हावा, यादृष्टीने लक्ष देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर सुधार प्रन्यासच्या लेआउट परिसरामध्ये देखील मनपाने जलवाहिनी टाकण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

मलजलवाहिन्यांची समस्या सर्व शहरात असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. मलजलवाहिन्या चोकेज होण्याच्या समस्यांवर तातडीने निराकरण होणे आवश्यक असून त्यासंदर्भातील प्रणाली बळकट करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. मलजलवाहिन्यांचे चोकेजची समस्या सोडविली जावी यासाठी मनपाद्वारे वाहनांची संख्या ८ वरून २० करण्यात आली आहे. याशिवाय नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत जायका कडून २४०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या प्रकल्पातून शहरात नवीन मलजलवाहिन्यांचे नेटवर्क तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

संपूर्ण शहरातील नागरिकांकडून कचरा, स्वच्छता, मलजलवाहिन्यांच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे या समस्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी याबाबत उपाययोजना करावी व त्याची खालच्या स्तरावर व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने लक्ष देण्याबाबत देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देखील दिले. बैठकीमध्ये बाजार विभागाच्या संदर्भात सादरीकरण देखील करण्यात आले.

या विषयांसोबतच नागपूर शहरातील मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागांतर्गत सुरु असलेल्या सर्व प्रकल्पाची सद्यस्थिती व नियोजित प्रकल्पाची माहिती, नागपूर शहरात सध्याला विविध विभागांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट रस्त्यांबाबत सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने अडचणी बाबत उपाययोजना, नागपूर शहरातील विविध वसाहतीमधील कच्चे रस्ते बांधकाम करण्याबाबत धोरण निश्चित करणे, नागपूर सुधार प्रन्यास मधील आरक्षण बाधीत अभिन्यासाची सद्यस्थिती, नागपूर शहरातील अनधिकृत अभिन्यासातील गुठेंवारी नियमांतर्गत भुखंड नियमित करण्याबाबत सद्यस्थिती व शासनाने दिलेल्या आदेशानुसार याबाबत तातडीने कार्यवाही करणे तसेच नागपूर शहरातील दलीत वस्ती योजना अंतर्गत निधीतील कामे या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपअभियंता राजीव गौतम, माजी नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे,अविनाश ठाकरे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री गणेश मंदिर टेकडी तर्फे गणेशोत्सवा अप्रतिम सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई

Sun Sep 8 , 2024
नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर हे नागपूर वासीयांचे आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायका पैकी एक पौराणीक श्रध्दास्थान आहे. श्री गणेश उत्सवानिमीत्य कार्यकारीणी मंडळातर्फे भव्य तयारी करण्यात आली आहे. “श्री” च्या गाभा-यातील सजावट पंकज अग्रवाल यांनी केली आहे. विशेष म्हणजे भक्तांना दर्शनाकरीता कोणतेही गैरसोई होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थी निमित्य दहा दिवस महाप्रसादाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com