मोवाड जुनी वस्ती विठ्ठल मंदिरात अज्ञात व्यक्तीने केली चोरी

नरखेड :- दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी पुजारी वसंतराव पुसदकर मंदिरात पूजा करण्यास गेले असता. त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मंदिराचे गाभाऱ्या जवळील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिराचे शिवलिंग वरील तांब्याची कळशी, दोन तांब्याचे गडवे,आरती ताट,पंचारती भांडे, पितळची कृष्णाची मूर्ती,दोन मोठ्या समया चोराने चोरून नेल्याचे दिसले. व मंदिरातील छोटी दानपेटी तोडून त्यातील दानचे दोन हजार रुपये काढून नेले.तसेच मोठी दान पेटी फोडण्याचा प्रयत्न केला .ती चोरट्या कडुन फुटली नाही .

ही चोरीची घटना काल शनिवार रात्री मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले.आजच या बाबत मोवाड पोलिसांना विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार समिती तर्फे चोरीची गुन्हा दाखल करण्यात येऊन पंचनामा केला मोवाड पोलीस चौकीचे करत असून पुढील तपास नरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शन अंतर्गत मोवाड पोलीस चौकीचे ईचार्ज प्रेमराज सनेसर,शिपाई गणेश ताजने, हे चोराचा शोध घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेवारस बॅगने रेल्वेत खळबळ, श्वान पथकाकडून तपासणी

Mon Oct 9 , 2023
– अहमदाबाद – हावडा एक्सप्रेसमधील घटना नागपूर :-धावत्या रेल्वेत एका बेवारस बॅगने प्रचंड खळबळ उडाली. गाडी नागपूर स्थानकावर आल्यानंतर बॅगची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. श्वान लियोने बॉम्ब सदृष्य वस्तू असल्याचा कुठलाच ईशारा दिला नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. 12833 अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस नागपूरच्या दिशेने येत असताना एस-3 बोगीतील 49 क्रमांकाच्या बर्थवर एक बॅग बेवारस आढळली. बराच वेळ पासून बॅगचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!