संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना रेल्वे मार्गावरील महावीर नगर ते सईद नगर रेल्वे रुळावर अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने एका 40 ते 50 वर्षे वयोगटातील इसमाचा मृत्यु झाक्याची घटना काल सकाळी सात वाजता निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणी साठी मृतदेह कामठी च्या श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.