अमरावती :- दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी संपन्न होणाया संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेच्या निवडणूकीची जय्यत तयारी सुरु असताना या निवडणूकीच्या संदर्भात असणाया तांत्रिक बाबींबद्दल तंत्रशुद्ध पद्धतीने निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडावी, यासाठी विद्यापीठ अधिसभागृहात विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता मतमोजणी प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख, उपकुलसचिव (आस्था.) मंगेश वरखेडे व प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे उपस्थित होते. याप्रसंगी प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे यांनी पी.पी.टी. प्रेझेन्टेशनद्वारे उपस्थितांना निवडणूक मतमोजणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देतांना मतपत्रिकेची वैधता, कोटा काढायची पद्धत, अधिकची मते वाटप, एलिमिनेशन, पार पाडावयाची मतमोजणी प्रक्रिया, सरप्लस, कोटा काढण्याचे सूत्र, परिनियमानुसार महत्वाच्या सूचना, अपिल, फेरमतमोजणी बाबत निर्णय आदींवर भर देण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख, उपकुलसचिव मंगेश वरखेडे व प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे यांनी समर्पक उत्तरे दिलीत. मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी , विद्यापीठातील मतमोजणी प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com