अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विद्यार्थी मंडळाचे गठण करण्यात आले. अध्यक्षपदी उमेश सहारे, उपाध्यक्षपदी प्रा. गजानन बनसोड तर सचिवपदी वाल्मिक डवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कर्यकारिणीमध्ये ए. एल. अंभोरे (सहसचिव), संगीता मंडे (कोषाध्यक्ष ), आर. बी. मतले (सह कोषाध्यक्ष ), सदस्य म्हणून ए. ए. पठाण, नम्रता खंडारे, चारुशीला खिराडे, योगिता थोटे यांची निवड करण्यात आली. मंडळांतर्गत विविध समित्या गठित करण्यात आल्यात. यामध्ये ॲड. महेंद्र तायडे, राहुल मिश्रा (प्रसिध्दी समिती सदस्य), अरुण रामटेके, एस.टी. पाटील (सहल समिती), आदिती कांबळे, कुमुदिनी गाडे, पी.एम. वानखेडे, शारदा गणोरकर (सांस्कृतिक कार्यक्रम समिती), छाया बडगे, ॲड. प्रकाश खंडारे (अतिथी व्याख्यान समिती), हनुमान पेंदोर, विश्वास काळे ( सेमिनार समिती) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
अभ्यास मंडळ स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. गजानन मुळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागातील अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समाज घटकांमध्ये सामाजिक मूल्यांची वृध्दी करण्यासाठी अभ्यास मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजानातून विद्याथ्र्यांंचे अनुभवविश्व संपन्न करणारा विचारमंच अशा अभ्यास मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होत असतो. विद्याथ्र्यांनी आपली वैचारिक पातळी वृध्दींगत करावी, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. विभागातील शिक्षक डॉ. बी.आर. वाघमारे, डॉ. वामन गवई, प्रा. सुरेश पवार, प्रा. रामचंद्र वरघट, व प्रा. झोड यांनीही मनोगत व्यक्त करुन अभ्यास मंडळाच्या पदाधिका-यांचे अभिनंदन केले.