नागपूरला मोतीबिंदूमुक्त करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्धार

नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने कर्ण व नेत्र दोष तपासणी शिबिरे नियमित आयोजित केली जात आहेत. आतापर्यंत हजारो लोकांचे डोळे तपासण्यात आले आहेत. येत्या काळात संपूर्ण नागपूर मोतीबिंदूमुक्त करायचे आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाला, २७ मे रोजी स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या मेडिकल व्हॅनचे लोकार्पण झाले. त्यानंतर संपूर्ण नागपुरात नेत्र व कर्णदोष तपासणी शिबिरांचे आयोजन सुरू झाले. ‘या शिबिरांतर्गत आतापर्यंत ५ हजार ३४० नागरिकांचे डोळे तपासण्यात आले. यातील ३८७ लोकांना मोतीबिंदू असल्याचे आढळले असून ९० लोकांवर आतापर्यंत शस्त्रक्रिया सुद्धा झाल्या आहेत. नागपुरात एकाही व्यक्तीला मोतीबिंदूचा त्रास असू नये असे माझे प्रयत्न आहेत,’ अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली. या शिबिरांमार्फत आतापर्यंत २ हजार लोकांना चश्म्यांचे वाटप करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आढळत आहे, त्यांच्यावर डॉ. महात्मे हॉस्पिटलमध्ये निःशुल्क शस्त्रक्रिया केली जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बिबट्या वाघ आला पळा रे पळा

Sat Jul 1 , 2023
– बिबट्याच्या पंज्याचे ठसे आढळल्याने रिधोरा परिसरात दहशत काटोल :-गेल्या अनेक वर्षापासून रिधोरा बोरखेडी कोकर्डा या भागात वाघ असल्याची ओरड अनेक शेतकरी करीत आहे काही शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन सुद्धा झाले होते नुकतेच शुक्रवारला किरण टालाटुले यांच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आल्यामुळे एकच दहशत पसरली पंजे आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांनी कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सदर शेताची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com