केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गायक विशाल जोगदेव यांना यूट्यूब चा सिल्वर प्ले बटन अवार्ड 

– नागपुरातील गायक विशाल जोगदेव यांची सोशल मीडियावर धुमाकुल

नागपूर :- शहरातील सुप्रसिद्ध गायक विशाल जोगदेव यांना यूट्यूब कडून आलेला सिल्वर प्ले बटन अवार्ड केंद्रियमंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते तसेच बंटी कुकडे यांच्या शुभहस्ते १६ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला.

नागपुरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे की, ” विशाल जोगदेव ” हे नागपुरातील पहील असं भक्तिगीताचं युटयूब चैनल आहे की, ज्याला युटयूब कडून हा विशेष अवार्ड देण्यात आला आहे. व त्यासाठीच केंदीयमंत्री नितिन गडकरी यांनी सुद्धा विशाल यांचे विशेष कौतुक केले आहे. गायक विशाल जोगदेव हे त्यांच्या विशिष्ट व सुमधुर गायन शैलीमुळे नेहमीच सर्वांना मोहित करतात व त्यामुळेच आज युटयूब तसेच सर्वंच सोशल मीडिया वर विशाल जोगदेव यांचे असंख्य चाहते आहेत.

विशाल जोगदेव यांनी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, साधना सरगम अश्या अनेक नामवंत गायकां सोबत अनेक युगलगीते गायली असून आजपर्यंत 1500 हुन अधिक भक्तिगीते भारतातील बऱ्याच नामांकित कंपनियां साठी गायलेली आहे. यातील “आई माझी मायेचा सागर”, “जरीकी पगड़ी बांधे” अशी बरीच भक्तिगीते प्रचंड वायरल झालेली आहेत.

विशाल जोगदेव यांनी महानुभाव पंथासाठी देखील अनेक अजरामर भक्तिगीते गायलेली आहेत व त्यामुळेच विशाल यांना महानुभाव पंथात “भजनसम्राट” या उपाधीने संबोधल्या जाते.

विशाल जोगदेव यांनी नागपुरातील संस्कार विद्या सागर या शाळेतील शिक्षक व्यवसाय सांभाळून हे यश संपादन केले आहे.

विशाल जोगदेव हे गेल्या तेवीस वर्षा पासून भजनसंध्या च्या माध्यमातून भारतातील बऱ्याच गावोगावी जाऊन निरंतर समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. त्यांनी आज पर्यंत हजारोंहुन अधिक समाज प्रबोधनाचे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले आहे. तसेच विशाल जोगदेव हे सर्वं सोशल मीडियावर सर्च होणारे विदर्भातील एकमेव गायक आहेत. त्यांचा या विशेष कार्यासाठी विशाल जोगदेव यांना कृतज्ञता पुरस्कार, महाराष्ट्र कला सम्मान, विदर्भ गौरव पुरस्कार, विदर्भ आईडल अश्या अनेक पुरस्काराने सम्मानित सुद्धा केल्या गेलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षपूर्ती निमित्त संघमित्रा सेवा प्रतिष्ठान द्वारे "नेत्री सम्मेलन

Tue Sep 19 , 2023
नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षपूर्ती निमित्त संघमित्रा सेवा प्रतिष्ठान द्वारे “नेत्री सम्मेलन आगामी काळात आयोजित केले आहे. नागपुरातील विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने हे सम्मेलन होणार आहे. अश्याच एका कर्तृत्ववान नेत्रीला भेटण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा योग या नेत्री सम्मेलनाच्या आयोजक चमूला मिळाला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इथे शास्त्र म्हणून कार्यरत आणि नागपूरची स्नुषा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!