जिवानाशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

मौदा :- अंतर्गत ०७ कि.मी अंतरावरील मौजा सिंगोरी येथे दिनांक ०५/०९/२०२३ चे ०८.३० वा. दरम्यान फिर्यादी  भागोबाई सखाराम गंगोबोईर, वय ४७ वर्ष रा सिंगोरी ता. मौदा जि. नागपूर यांचा मुलगा जखमी लक्ष्मीनारायण गंगोबोईर हा घराजवळील गल्ली झाडत असता आरोपी रोहीत चंद्रवंशी वय ४८ वर्ष, रा. सिंगोरी ता. मौदा जि. नागपूर हा तिथे आला गल्ली साफ सफाई करतांना पाहून म्हणु लागला की, ही गल्ली माझा मालकीची आहे असे म्हणुन फिर्यादीच्या मुलासोबत झगडा भांडण करू लागला व तुमची एकदाची किरकिर मिटवुन टाकतो आज तुला खतम करून टाकतो असे म्हणुन त्याचे घरी जावुन लोखंडी पावड़ा घेवुन आला व डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले व शिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सदर प्रकरणी कियादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक भुते या करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

निळया आकाशासाठी स्वच्छ हवा दिन होणार साजरा, मनपातर्फे दुचाकी इलेकट्रीक वाहन व सायकल रॅली

Wed Sep 6 , 2023
चंद्रपूर :- हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्यादृष्टीने कृती करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिन गुरुवार ७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता दुचाकी इलेकट्रीक वाहन व सायकल रॅली काढली जाणार असुन त्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्राव्दारे ७ सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com