केंद्रीय मंत्री गडकरी यांचा जनसंपर्क रविवारी महापालिकेत

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी (दि. ४ ऑगस्ट) नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे. यावेळी ना.गडकरी विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकून घेणार आहेत.

४ ऑगस्ट २०२४ ला गडकरी महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहतील. सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत ते नागरिकांच्या मनपाशी संबंधित समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करतील.

याप्रसंगी महापालिका आयुक्त, अन्य अधिकाऱ्यांसह इतर मान्यवरही गडकरी यांच्या समवेत उपस्थित असतील. नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये मांडण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

निवेदनाच्या तीन प्रती आणाव्यात

जनसंपर्काला होणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर काउंटर लावले जाईल. या काउंटरवरून नागरिकांना टोकन नंबर दिले जातील. जनसंपर्काला येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची निवेदने सुवाच्छ अक्षरात लिहून आवश्यक त्या कागदपत्रांसह आणावीत. तसेच निवेदनाच्या तीन प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन गडकरी यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

विधानसभानिहाय सुनावणी

दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात सकाळी ११ ते दुपारी १२:४५ वाजेपर्यंत पूर्व, उत्तर आणि मध्य नागपूर या तीन विधानसभा मतदारसंघातील मनपाशी संबंधित समस्या गडकरी जाणून घेतील. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ते दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाडली बहनों' की सुरक्षा के लिए पहले 'लव जिहाद विरोधी कानून' बनाएं

Thu Aug 1 , 2024
– दादर में हिंदू राष्ट्र-जागृति आंदोलन में मांग – उरण की यशश्री शिंदे की निर्मम हत्या करनेवाले ‘लव जिहादी’ को सार्वजनिक रूप से फांसी दो  नागपुर :- महाराष्ट्र सरकार ने ‘मुख्यमंत्री लाडली बहन योजना’ शुरू की है, लेकिन वर्तमान में ‘लव जिहाद’ के खतरे के कारण हिंदू युवतियां और महिलाएं अभी भी असुरक्षित हैं और उनकी निर्मम हत्याएं जारी हैं। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com