मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने सकाळी 11.30 वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांना निरोप दिला.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, तसेच राजशिष्टाचार व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.