केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार , 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाचेच्या डिजिटल पोर्टलचे करणार उदघाटन

– संपूर्णपणे कागदरहित वापर ,बहु -राज्य सहकारी संस्था कायदा आणि नियमांचे स्वयंचलित पालन, व्यवसाय सुलभता , डिजिटल संवाद आणि पारदर्शक प्रक्रिया ही केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या संगणकीकरणाची मुख्य उद्दिष्टे

– हा संगणकीकरण प्रकल्प नवीन बहु -राज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी उपयुक्त ठरेल तसेच त्यांचे कामकाज सुलभ बनवेल

 नवी दिल्ली :-

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार , 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकार से समृद्धी ” या संकल्पनेत ठाम विश्वास दर्शवत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या अनुषंगाने , सहकार क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे.

केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या संगणकीकरणाची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

i पूर्णपणे कागदरहित वापर आणि प्रक्रिया

ii सॉफ्टवेअरद्वारे बहु -राज्य सहकारी संस्था कायदा (एमएससीएस कायदा) आणि नियमांचे स्वयंचलित पालन,

iii. व्यवसाय सुलभतेला चालना

iv. डिजिटल संवाद

v. पारदर्शक प्रक्रिया

vi. सुधारित विश्लेषण आणि एमआयएस (व्यवस्थापन माहिती प्रणाली)

केंद्रीय रजिस्ट्रार पोर्टलमध्ये खालील मॉड्युल्सचा समावेश केला जाईल :

i नोंदणी

ii पोट कायद्यांमध्ये सुधारणा

iii वार्षिक विवरणपत्र दाखल करणे

iv अपील

v. लेखा परीक्षण

vi तपासणी

vii चौकशी

viii लवाद

ix. संस्थांचे कामकाज बंद करून मालमत्ता विक्रीद्वारे थकित रक्कम अदा करणे (वाइंडिंग अप आणि लिक्विडेशन)

x लोकपाल

xi निवडणूक

नवीन पोर्टल एमएससीएस कायदा, 2002 आणि त्याच्या नियमांमध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या सुधारणांचाही समावेश करेल. पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक वर्क फ्लोद्वारे अर्ज/सेवा विनंत्यांसंबंधी प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने हाताळली जाईल. हा संगणकीकरण प्रकल्प नवीन एमएससीएसच्या नोंदणीसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांचे कामकाज सुलभ बनवेल.

देशात 1550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. बहु-राज्य सहकारी संस्था कायदा, 2002 च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय निबंधक कार्यालय जबाबदार आहे. बहु-राज्य सहकारी संस्थांचे सर्व कामकाज सुलभ करण्यासाठी आणि नवीन बहु-राज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसह डिजिटल व्यवस्था तयार करण्यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे.

नव्याने विकसित केंद्रीय निबंधक कार्यालय पोर्टल डॅशबोर्ड तयार करण्यासाठी युवकांचा सहभाग आणि कल्पना आमंत्रित करण्यासाठी ‘हॅकेथॉन’ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तहसील कार्यालयात 'सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम'

Sat Aug 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महसूल विभागामार्फत कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून 1 ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने आज 5 ऑगस्ट रोजी कामठी तहसील कार्यालयातील महसूल विभाग तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे तहसील कार्यालय तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी ‘कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मोठ्या संख्येतील माजी सौनिकांनी उपस्थिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com