नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिके तर्फे वांजरा येथे अल्प उत्पन्न गटासाठी वांजरा येथे 480 घरकूल प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपुजन केंद्रिय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
नागपूर महानगरपालिका व स्वप्न निकेतन यांच्या संयुक्तपणे हा प्रकल्प सुरु करण्यात येत असून या प्रकल्पाअंतर्गत 14 हजार 160 चौरस मिटर परिसरात आठ इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक घरकूल धारकांना 427.54 चौ.फुट जागा देण्यात येणार असून या प्रकल्पामध्ये कर्ज सुविधा सुध्दा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामध्ये 12 लाख 19 हजार 465 रुपयाच्या सदनिका असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 9 लाख 69 हजार 465 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
महानागरपलिकेतर्फे घरकूला संदर्भात जाहिरात देऊन लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 24 माहिन्यात पूर्ण होणार असून या प्रकल्पामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होणार असून मियावॉकी फॉरेस्ट चा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त् राधाकृष्ण बी. यांनी दिली.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाची पाहणी केल्या नंतर कोण शिलेचे अनावरण केले. प्रारंभिक एसडीपीलचे विकासक अनिल अग्रवाल व गौरव अग्रवाल यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार मिलींद माने, माजी महापौर संदिप जोशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रविद्र भेलावे, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार तसेच परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर मेट्रोनी प्रवास
प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाच्या भूमिपुजना नंतर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी मार्गावरील ऑटोमॉटिव्ह चौकातून मेट्रोने प्रवास करत संविधान चौकातील वातानुकूलीत विद्युत बस लोकार्पण समारंभासाठी आगमन झाले. नागपूर मेट्रोचा आल्हाददायक प्रवासाचा अनुभव घेतांना वेळेची सुध्दा बचत झाली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रवासानंतर आपली प्रतिक्रीया दिली.