‘उमेद’ ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त करणारे माध्यम – गिरीष महाजन

Ø महिला मार्गदर्शन मेळावा

Ø 7 हजार महिलांची उपस्थिती

यवतमाळ :- उमेदच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे. उमेद केवळ महिलांना आर्थिक सक्षम करणे, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी नसून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिसाद ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्यावतीने महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत प्रभाग संघ, प्रभाग संघामधील पदाधिकारी व समुह संसाधन व्यक्ती यांच्यासाठी समता मैदान येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाराज बोलत होते.

यावेळी खा.हेमंत पाटील, आ.मदन येरावार, आ.डॉ.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाने, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, नितीन भुतडा, तारेंद्र बोर्डे, उपस्थित होते.

महिला बचतगटांना दिल्या जाणाऱ्या बँक लिंकेजमध्ये एक लाखावरुन २० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. फिरता निधी ३० हजार ईतका करण्यात आला. समुह संसाधन व्यक्तीचे मानधन ३ हजारावरुन ६ हजार ईतके करण्यात आले आहे. महिला व महिला गटांना सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध करुन दिल्या जात आहे. भविष्यात महिला गटांना दिले जाणारे कर्ज, विविध प्रकारच्या अनुदानात वाढ केली जाणार असल्याचे महाराज यांनी सांगितले.

महिला गटाने उत्पादीत केलेल्या वस्तू विदेशात देखील विकल्या जात आहे. महिला सर्व प्रकारचे उत्पादन घेऊ शकतात. त्यांना खरी गरज आहे, उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळण्याची. भविष्यात यासाठीच आम्ही काम करणार आहोत. प्रत्येक जिल्हा ठिकाणी व नंतर तालुकास्तरावर त्यांच्या उत्पादीत वस्तूंना विक्रीची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला घरे, शौचालये उपलब्ध करुन दिली. प्रत्येकाला नळाद्वारे स्वच्छ पाणी, मोफत धान्य, प्रत्येक गरीब मानसाला विमा संरक्षण उपलब्ध करुन दिले. महिलांना आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी अनेक नवीन उपक्रम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी अधिक चांगले काम करुन आपला गट, आपला संघ अधिक सक्षम कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे महाराज यांनी सांगितले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.येरावार यांनी महिलांचे प्रभागसंघ मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिला ही घरातील कर्ता भगिनी झाली पाहिजे. महिलांना आपल्या वस्तू विकता याव्या यासाठी शहराच्या मध्यभागात पाच हजार स्क्वेअर फुटाचा हॅाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. गरज पडल्यास अजूनही विक्री व्यवस्था उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.

सन 2023-24 मध्ये बॅकांनी जिल्ह्यातील 10 हजार 748 महिला गटांना 288 कोटी रुपयांचे बॅंक लिंकेज उपलब्ध करून दिले आहे. महिलांना उत्तमपणे लिंकेज उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.महाजन यांच्याहस्ते बॅंकांच्या जिल्हा समन्वयकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी समुह संसाधन व्यक्तीच्या वाढीव मानधनाचे वाटप करण्यात आले. आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हाभरातून आलेल्या 7 हजारावर महिला उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रहार मिलिट्री स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी सालबर्डी येथे चार दिवसांच्या साहसी शिबिराचे आयोजन

Mon Feb 26 , 2024
नागपूर :- सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिट्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सालबर्डी येथे 20 फेब्रुवारी ते 23/02/2024 या चार दिवसांच्या कालावधीत साहसी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहाटे 5 वाजता सर्व मुले झेंडावंदनासाठी उपस्थित राहत त्यानंतर सकाळच्या रूट मार्चसाठी निघत. अमरावती जिल्ह्यातील, मोर्शी तालुक्यातील, सालबर्डी ‘हे पर्वतराजाच्या कुशीत वसलेले गाव आहे. नैसर्गिकदृष्ट्या अतिशय संपन्न असलेल्या या गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com