युक्रेन देशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधावा

-जिल्हाधिकारी आर. विमला
आतापर्यंत पाच पालकांनी संपर्क साधला
नागपूर,दि. 25 : रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोणी नागरिक असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. 0712-2562668
ई-मेल- rdc_nagpur@rediffmail.com
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली
हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री)
फोन – 011-23012113/23014105/23017905
Fax no.-011-23088124, Email ID:-situationroom@mea.gov.in
नागपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. विमला यांनी केले आहे.
आतापर्यत नागपूर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. ही मुले युक्रेनमध्ये आहेत. या मुलांची नावे व अन्य संपर्क माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षामार्फत केंद्र शासनाला कळविण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधुत प्रबंधन की लालफीताशाही का नतीजा भोजनावकाश से वंचित ठेका श्रमिक

Sat Feb 26 , 2022
-टेकचंद शास्त्री संयुक्त कृति समिति ने न्यायालय का दरवाजा खटखटाने की चेतावनी  कोराडी –   विधुत परियोजना प्रबंधन की हटधर्मिता और लालफीताशाही नीतियों का नतीजा ठेका श्रमिकों को भोजनावकाश से वंचित रखने घिनौना षड्यंत्र खेला जा रहा हैl और श्रमिकों ने समय पर भोजन नहीं करने दिया तो उनका शारीरिक स्वास्थ्य और मानसिक संतुलन बिगड सकता है? संयुक्त कृति समिति […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com