संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-गॅसचे दर वाढल्याने उज्वला गॅस योजनेचे वाजताहेत तीनतेरा
कामठी ता प्र 16 :- केंद्र सरकारने मोठा गाजावाजा केलेल्या उज्वला गॅस योजनेला सध्या घरघर लागली आहे.केंद्रात सन 2014 ला सत्ताबदल झाला तेव्हा घरगुती गॅस सिलेंडर चे 410 रुपये होते आज 8 वर्षाचा काळ लोटल्यानंतर हेच दर 1003.50रुपया पर्यंत जाऊन पोहोचले आहे शिवाय गॅस वर मिळणारे अनुदानही दोन वर्षांपासून मिळत नसल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.केंद्र सरकारकडून ग्राहकांची क्रूर थट्टा केली जात आहे.तेव्हा अशा फसव्या उज्वला गॅस योजनेला चुलीत घाला अशा संतप्त प्रतिक्रिया लाभार्थी ग्राहकाकडून केल्या जात आहे.
पूर्वी गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून केरोसीन मिळत होते ,केरोसींनचा वापर करून गोरगरीब मंडळी स्टोव्ह वर स्वयंपाक करीत होते.पण 2014पासून रेशन दुकानातुन केरोसीन मिळणेही बंद झाल्यानंतर अनुसूचित जाती घटकासह अन्य विविध सर्वसामान्य महिलांसाठी केंद्र शासनाने फसवी उज्वला गॅस योजना आणली.या योजने अंतर्गत लाभार्थ्याना दरमहा एक गॅस सिलेंडर मिळते सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपया पर्यंत मिळणारी सबसिडी आता नावालाच मिळत आहे.गॅस सिलेंडरचे दर वाढल्या नंतरही सबसिडी मात्र वाढलेली नाही. सध्या गॅस सिलेंडर चा दर एक हजार रुपयांच्या वर गेला आहे.हातावर पोट असलेल्याना तेवढी रक्कम देऊन सिलेंडर खरेदी करणे परवडत नाही .या पाश्वरभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.त्यामुळे आपली चुलच बरी, चुलीत टाका त्या उज्वला गॅस योजनेला असे लाभार्थी महिला रोषाने सांगत आहेत.