वादळ संवाद – एक वादळ भारताचं चळवळीचं वार्षिक संमेलन, सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींचा गौरव सोहळा

नागपूर :- एक वादळ भारताचं चळवळीतर्फे 2016 पासून प्रत्येकवर्षी “वादळ संवाद – संमेलन” घेण्यात येत असते. त्याचनिमित्ताने याहीवर्षी “वादळ संवाद” हे संमेलन बळीराजा संशोधन केंद्र, मराठा सेवा संघ लॉन, नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचा उद्देश म्हणजे एक वादळ भारताचं चळवळीच्या माध्यमातून “स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनि” 7 राज्यात, 450 पेक्षा जास्त ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन व झेंडावंदनाचे कार्यक्रम करण्याची जबाबदारी स्थानिक प्रतिनिधी “लीडर्स” च्या माध्यमातून पार पाडण्यात येत असते. तर या सर्व प्रतिनिधींना चळवळीत काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी त्यांच्या कार्याची दखल म्हणून कौतुकाची थाप म्हणून “वादळ संवाद” या वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

चळवळीचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाठीशी ठाम उभे राहणाऱ्या मंडळींचा तसेच चळ्वळीसोबत काम करणाऱ्या विविध संघटनांचा व विविध तालुक्यातील, जिल्ह्यातील, गावातील प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. येणाऱ्या काळात हि चळवळ अजून गावागावांमध्ये पसरवण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली आणि राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हितेश डफ आणि संकेत नांदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव शिंदे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तेजस पाटील यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून अँबियन्स रेस्टॉरंटचे मिलिंद साबळे, हायड्रो इंडिया इंजिनीरिंगचे निखिल चौधरी, नेक्सस प्रोग्रेस अकादमीचे प्रितेश पवार, माजी सैनिक संघटनेचे संतोष मालेवार, सॉल्व्हरझ अकादमीचे तेजाशीश सावळे, प्रा. सय्यद मकसूद, लालसिंग स्पोर्ट्स अकादमीचे लालसिंग यादव उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील रोहित काटे आणि बुलढाणा जिल्ह्यातील डॉ नकुल उगले पाटील यांचा तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ लाखो लोकांपर्यंत पोहोचजवण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या सोशल मीडिया इंफ्ल्युइन्सर प्रियांका पाटील, अश्विन गणवीर, हर्ष मते, विपुल लोखंडे यांचे सुद्धा स्नमानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच गौरव करण्यात आलेल्या विविध संस्थांमध्ये शिवराजे ढोलताशा पथक, दोनच राजे ढोलताशा पथक, शिवशक्ती आखाडा, लालसिंग स्पोर्ट्स अकादमी, सेंट झेवियर्स स्कुल हिंगणा, आयुब डान्स अकादमी, भिमाई लेझीम पथक, विवेकानंद पब्लिक स्कुल, नागपूर डिस्ट्रिक्ट इक्वेस्ट्रीअन हॉर्स असोसिएशन, इंडो लीडर्स, समता सैनिक दल, कलाकार प्रोडक्शन सारख्या विविध संस्था उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून निक्कू हिंदुस्तानी, अनुप मुरतकर, प्रकाश खंडागळे, नितीन पिल्ले, शुभम कवडे, मंथन पिल्लारे, नंदिनी निखारे, ललित सनेसार, अक्षय लक्षणे यांनी जबाबदारी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरात ‘शासन आपल्या दारी’चे ७ लाखावर लाभार्थी

Wed Sep 6 , 2023
– उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्य नागपुरातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप नागपूर :- ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या अभियानांतर्गत नागपुरात जनसामान्यांना लाभ देण्याचे चांगले कार्य सुरू आहेत. आतापर्यंत ७ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून प्रशासनाने लवकरच २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com