– २५ वर्षापासूनची परंपरा समोरही कायम राहणार – रिद्धी देशमुख
नरखेड :- सबला महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा आरती अनिल देशमुख याच्यां सौज्यन्याने शाखा मोवाड येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोवाड येथे महात्मा ज्योतीबा फुले सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रिद्धी सलील देशमुख, राहत ऋषिकेश देशमुख, डॉ पायल गौरव चतुर्वेदी, पूजा देशमुख,जोहरा खोजा, कल्पना गोमासे, संगीता सुर्यवंशी, शारदा कोल्हे, रेखा चढोकार, वैशाली दांडेकर, वंदना कोठे, निर्मला वैद्य, तुळशाबाई जेवणे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला नारी शक्तीच प्रतिक म्हणून २५ वर्षापासूनची हळदी कुंकूची वाटचाल परंपरा ठेवत समोरही कायम राहणार अशा अनेक महिलाच्या निगडित विषयावर रिद्धी देशमुख यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मोवाडसह खैरगावं, देवळी, जूनोना, गोधनी, बेलोना, पांढरी, गायमुख, येथील दोन हजार महिलानी उपस्थित राहून हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंदाने आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला मोवाड येथील महिला संगीता लाडूकर, शिल्पा लहुकर, विना वानखेडे, रवीना डोगरदिवे, प्रतिभा येवले, नंदा कुंभारकर, सुरेखा पुसतकर, माजी नगराध्यक्ष अनिल साठोने, विनय वैद्य, रवि कुंभारकर, मंगेश नासरे, किशोर येवले, आदी राष्ट्रवादी महिला, पुरूष, पदाधिकारी, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक निर्मला वैद्य, संचालन वनिता देवघरे, तर आभार रंजना सोळंकी यांनी मानले. सहभागी महिलांना हळदी कुंकू व चाह नाश्ता देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.