अमरदिप बडगे,प्रतिनिधी
शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित.
गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली. असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका विरुद्ध भारतीय दंड १८६०, ३२४, ३४ अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ ३(२) (५) अंतर्गत गुन्हा नोंद केला, असुन दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना निलंबित केले आहेत. तर शाळा व्यवस्थापन आपल्या शाळेची बदनामी करण्यात येत आहे. तर २२ वर्षा पासून आमच्या शाळेत अशी घटना अद्याप घडली नाही तर शिक्षकांना आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही विद्यर्थाना शिक्षाकडून मारहाण करू नये असे आदेश हि देण्यात आले होते मात्र या शिक्षकांनी त्या विद्यर्थाला मारहाण केली हे चुकी त्यांची आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना निलंबित केले आहे.