संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान-कन्हान नगर परिषद अंतर्गत प्रभाग नं 05, धरम नगर येथे स्ट्रीट लाईटच्या पोल ला करंट सुरू असून पोल जवळच्या बाजूला असलेल्या घरची लहान मुलगी थोडक्यात बचावली दी.18 मे 2022 ला घटना घडली असून नगर परिषद, नगराध्यक्षा, नगर सेवकांना माहीती देऊन सुद्धा आता पर्यन्त नगर परिषद कडून कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, नगर परिषद मोठि जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे तेथील नागरिक रोज हया बद्दल माहिती देत आहेत एवढ होऊन सुद्धा आता पर्यंत नगर सेवक आणि नगर अध्यक्षा यांनी घटना स्थळाची पाहनी सुद्धा केलेली नाही. या बद्दल नगर परिषद मुख्याधिकारी आणि कन्हान पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे.
सर्वात महत्वाच म्हणजे धरम नगर येथे कन्हान नगर परिषद च्या अध्यक्षाचं घर हे घटना स्थळा पासून 100 ते 150 मीटर वर आहे पन 5 ते 6 दिवसाच्या वर लोटुन सुद्धा आता पर्यंत पोल दुरुस्त करण्यात आले नाही. जर का त्या पोलला करंट लागून कोनाची जीवीत हानी झाली तर नगरपरिषद शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहतील हया प्रकारचे लेखी निवेदन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
विद्दुत धक्क्याने दोन डुकरांचा जागीच मृत्यू,तर एक लहान मुलगी सुदैवाने बचावली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com